गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला फेसबूकवर newsfeed मध्ये फक्त काही लोकांचे अपडेट दिसत आहेत का? गेले काही दिवस तुम्ही पोस्ट केलेल्या status मॅसेजना,फोटो आणि लिंकना फक्त काही निवडक लोकांकडूनच प्रतिसाद मिळतो आहे का? बाकी लोक तुमच्या पोस्ट कडे दुर्लक्ष करत आहेत का?
काळजी करू नका,हे सर्व त्यांनी तुमच्या पोस्ट कडे दुर्लक्ष केल्यामुळे घडत आहे असे जर तुम्हाला वाटत असेल,तर ते साफ चुकीचे आहे.कारण तुमच्या
बहुतेक मित्राना तुमचे पोस्ट दिसतच नाही आहेत.याला कारण आहे फेसबूकने केलेले नविन बदल.
बहुतेक मित्राना तुमचे पोस्ट दिसतच नाही आहेत.याला कारण आहे फेसबूकने केलेले नविन बदल.
नविन फेसबूक प्रोफाइलचा वापर केल्या पासून तुमचे जे newsfeed setting आहेत ते आपोआप default वर सेट झाले आहे,याचा अर्थ नविन प्रोफाइलचा वापर सुरु केल्या पासुन तुम्ही ज्या मित्रांच्या स्टेटस मॅसेज अथवा पोस्टना प्रतिसाद देत आहात किंवा जे मित्र तुम्हाला प्रतिसाद देत आहेत त्यांचेच अपडेट तुम्हाला newsfeed मध्ये दिसत आहेत,बाकी सर्व ज्याना तुम्ही प्रतिक्रिया देत नाही अथवा जे तुम्हाला प्रतिक्रिया देत नाहित त्यांचे अपडेट आपोआप मिळणे बंद होत आहे.
यावर उपाय काय?
तुमच्या फेसबूक प्रोफाईलवर तुमच्या प्रोफाईल फोटोच्या खाली newsfeed नावाचा पर्यांय दिसेल.त्यावर टिचकी दिल्यावर तुम्हाला सर्व मित्रांचे अपडेट दिसतील.
2)त्याच पानावर उजव्या बाजुला तळाला तुम्हाला Edit Option नावाचा पर्यांय दिसेल त्यावर टिचकी द्या.
मग Show Posts From पर्यांया समोरील All Of Your Friends and Pages निवडा आणि मग Save वर टिचकी द्या.
आता तुम्हाला तुमच्या सर्व मित्रपरिवाराचे अपडेट दिसायला लागतील..तुमचे अपडेट सुद्धा त्यांना दिसावे यासाठी त्यांना सुद्धा newsfeed setting कश्या बदलाव्यात? याची माहिती द्या.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.
nahi jamale
ReplyDelete