तुम्ही आताच ब्लॉगिंगला सुरुवात केली आहे,आणि काही काळाने तुम्हाला असे जाणवले की तुमच्या ब्लॉगचा पत्ता (URL) तुमच्या ब्लॉगच्या विषयासाठी योग्य नाही आहे, ते बदली करायचे आहे..पण कसे करावे ते तुम्हाला कळत नाही आहे..मग आता काय कराल??? नविन ब्लॉग बनवायचा म्हणजे पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागेल व आतापर्यंत केलेली सर्व मेहनत पाण्यात जाणार का ?
काळजी करू नका तुम्ही तुमच्या ब्लॉगचा पत्ता (Web URL) सहज बदलू शकता.
काळजी करू नका तुम्ही तुमच्या ब्लॉगचा पत्ता (Web URL) सहज बदलू शकता.
१) तुमच्या अकाउंट मध्ये लॉग-इन करा.
२) तुमच्या ब्लॉगर अकाउंटच्या Dashboard वर जा
३)(नविन बदल)ब्लॉगरच्या बदललेल्या नविन स्वरुपानुसार हे बदल करण्यासाठी आता तुमच्या ब्लॉगच्या नावावर टिचकी दिल्यावर तळाला जो Settings नावाचा पर्यांय दिसतो त्याचा वापर करा
४)त्यानंतर Basic टॅब मध्ये जा.
५)आता तुमच्या जुन्या ब्लॉगच्या पत्त्याच्या जागी(URL) तुम्हाला हवा असलेला नविन पत्ता टाईप करा...Word Verification झाल्यावर तुमच्या ब्लॉगचा नविन (URL) कार्यांन्वित होईल.
धोके:
१)तुम्ही जर नवखे ब्लॉगर असाल तर असे केल्याने तुमच्या ब्लॉगच्या लोकप्रियतेवर काही फरक पडणार नाही.
२)जर तुम्ही २-३ वर्षापासून ब्लॉगिंग करत असाल, तर ब्लॉगचा URL बदली केल्याने, तुम्ही तुमचा वाचकवर्ग,तुमच्या ब्लॉगचे गुगल सर्च इंजीन मधले स्थान, तुमच्या ब्लॉगची गुगलवरची लोकप्रियता Google Page Rank सर्व गमावून बसता.
३)तुमच्या ब्लॉगचा जुना URL,इंटरनेट वरच्या वाईट समूहां कडून बळकावला जावू शकतो व ते त्याचा वापर अश्लील साहित्य पसरवण्यासाठी करू शकतात. अश्या वेळी जर तुमच्या ब्लॉगचा जुना पत्ता(URL) तुमच्या नातेवाईकांकडे असेल तर तुमच्या विषयी गैरसमज होवू शकतो.
४)म्हणून जर तुम्हाला तुमच्या ब्लॉगचा जुना URL बदलायचा असेल तर विचार करून बदला, अथवा बदली केलेल्या जुना URL आपल्याच नावावर re-register करून ठेवा आणि त्याचा वापर, तुमच्या नविन ब्लॉगकडे redirect करण्यासाठी करा.
धन्यवाद. :-)
nice information prashant.
ReplyDeleteधन्यवाद. ;-)
ReplyDelete