मित्रानो जर तुम्हाला ऑनलाइन पैशाची देवाणघेवाण करायची असेल तर तुम्हाला paypal अकाउंट ची गरज असते.तुम्ही तुमच्या ब्लॉगवर जाहिराती दाखवता,त्या बदल्यात तुम्हाला जो मोबदला मिळतो तो तुमच्या बॅक अकांउट मध्ये पाठवायचा सोप्पा मार्ग म्हणजे तुमचे paypal Account.
ऑनलाइन पैशाच्या स्थानांतरणासाठी (money transfers) साठी ही पद्धत जगभर वापरली जाते आणि ती अतिशय सुरक्षित आहे.
paypal Accountचे ३ प्रकार आहेत..ते खालील प्रमाणे आहेत.
Personal Paypal Account =हे अकांउट वैयक्तीक वापरासाठी असते,ज्याचा वापर तुम्ही ऑनलाइन वस्तू खरेदी करण्यासाठी करू शकता.तसेच तुमच्या या अकांउट वर पैशांचे स्थानांतरण (money transfers) सहज,जलदगतीने होते.याची कोणतीही फी Paypal तुमच्या कडून घेत नाही,म्हणजे ७००० ते ५०००० रुपया दरम्यान काहीही फी नाही आहे,पण जर रक्कम ५०००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला ६९९९.९९ च्या आसपास रक्कम, स्थानांतरीत करण्याची फी म्हणून द्यावी लागते.
Premier/Business Paypal Account: जर तुमचा ऑनलाइन खरेदी-विक्रीचा मोठा व्यवसाय असेल,आणि पैशाची बरीच मोठी उलाढाल होत असेल तर तुम्हाला अश्या प्रकारच्या अकांउटची गरज असते.
तुमचे Paypal Account कसे बनवाल?
१)प्रथम https://www.paypal.com ही साईट तुमच्या संगणकावर उघडा.. https प्रोटोकॉलचा वापर करा कारण ते अधिक सुरक्षित असते.

२)आता खाली चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे Sign Up वर क्लिक करा.
३)नविन पानावर तुम्हाला Create Your Paypal Account नावाचा पर्याय दिसेल,त्यामध्ये तुमचा देश समोर इंडिया निवडून नंतर अकांउट टाईप मध्ये खालील चित्रामध्ये दाखविल्याप्रमाणे Personal Account वरील Get Started वर क्लिक करा.
४)जे नविन पान ओपन होईल त्यात खाली दिलेल्या चित्राप्रमाणे तुमची सर्व खरी माहिती भरा.
५)तुमचा Pan Card नंबर सुद्धा ही माहिती भरताना आवश्यक आहे.
६)त्यानंतर Agree and Create Account वर क्लिक करा.
७)तुमचे Paypal Account तयार झाले.
८)आता तुमच्या इमेल आयडी वर एक verification मेल Paypal कडून येईल,त्यात दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
असे केल्याने तुमचे अकांउट व इमेल आयडी तुमचाच असल्याचे Paypalला कळेल.
आता पुढच्या भागात आपण हे पाहू की येणारा पैसा तुमच्या बॅक अकांउट मध्ये स्थानांतरीत करण्यासाठी तुमचे Paypal Account कसे verify करायचे?धन्यवाद,
प्रशांत दा. रेडकर.
0 comments:
Post a Comment