तुम्ही तुमच्या ऑफिस अथवा कॉलेज मध्ये unsecured wifi नेटवर्क असलेल्या संगणका वरून Facebook किंवा Twitter अकांउट वापरत आहात का? तसे असेल तर तुम्हाला तुमच्या अकांउटच्या सुरक्षितते बाबत विचार करायची वेळ आली आहे समजा.
जेव्हा जेव्हा तुम्ही facebook किंवा twiiter account वर लॉग-इन करता तेव्हा तुम्ही जर browser चा address bar पाहिला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे http://www.facebook.com/home.php? असे काहीसे दिसेल.
म्हणजे अजुन सुद्धा या साईट http protocol चा वापर करतात.खरे तर secured https protocol चा वापर करणे गरजेचे आहे.कारण तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल तुम्ही जेव्हा तुमच्या gmail account वर लॉग-इन करता तेव्हा https protocolचा वापर झालेला असतो...जो जास्त सुरक्षित आहे.
याच गोष्टीमुळे तुमचे Facebook आणि Twitter चे पासवर्ड Wifi वर सहज कोणीही हॅक करू शकेल..
हे कसे घडते?
१)firefox browser साठी Firesheep नावाचे freeware extension मिळते.
२)एकदा का ते इनस्टॉल केले की ते तुमच्या firefox browserच्या sidebar विंडो मध्ये उघडते.
३)एकदा उघडल्यावर ते तुम्हाला आता जे लोक unsecured wifi network मध्ये आहेत त्या सर्वांची यादी दाखवते.एकदा का ते लोक त्यांच्या फेसबूक अथवा twitter account मध्ये login झाले की तुम्हाला एक notification मिळते आणि फक्त एका क्लिक ने तुम्ही सहज त्यांच्या अकांउट मध्ये login होता.
आहे की नाही हे धक्कादायक.
४)ही संपुर्ण पद्धत cookie hijacking या technique वर काम करते.एकदा का तुमच्या cookie हॅक झाल्या की कोणीही सहज तुमच्या अकांउट मध्ये login होते. आणि unsecured wifi network वर अश्या cookies चोरणे सोप्पे जाते.
खबरदारीचे उपाय:
१)unsecured wifi networks वरून Facebook आणि Twitter वर लॉग-इन करणे टाळा.
२)http protocol ऐंवजी secured https protocol चा वापर करा.
उदा.https://www.facebook.com/
धन्यवाद मित्रांनो
काळजी घ्या.
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर
Home
इंटरनेट आणि नेटवर्क सिक्युरिटी( Internet And Network Security)
सावधान,तुमचे Facebook किंवा Twitter Account हॅक (Hack) होवू शकते.
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment