धन्यवाद मित्रांनो :-)
मित्र- मैत्रीणींनो,
खर तर आजचा हा ब्लॉग पोस्ट तुम्हा सर्वांचे आभार मानण्यासाठी लिहिला आहे...खरच मनापासून धन्यवाद.
खरतर मराठी मध्ये ब्लॉगिंगला सुरुवात करून ३ वर्ष झाली..पण वेळे अभावी मराठी मध्ये ब्लॉगिंग करणे शक्य झाले नाही...मग डिसेंबर महिन्यात मनाशी ठरवले की काही करून रोज एक तरी मराठी लेख ब्लॉग वर लिहावा.मला स्वत:ला ज्या विषयांची माहिती आहे ती सर्वां सोबत शेअर करावी...सतत इंग्रजी भाषेच्या संपर्कात असल्यामुळे संपुर्ण लिखाण शुद्ध मराठी मध्ये होतेच असे नाही..कधी कधी काही शब्दांवर गाडी अडकते सुद्धा...अश्या वेळी थांबून,थोडी शोधाशोध करून,मराठी शब्दांच्या जाणकारांची मदत घेवून लिखाण करावे लागते.तरी ही बर्याच वेळा इंग्रजी शब्दांना तसाच्या तसा प्रतिशब्द मिळतोच असे नाही आणि असे प्रतीशब्द वापरले की मुळ शब्दांचा अर्थ एक तर बदलून जातो अथवा कळतच नाही..कारण बर्याच ठिकाणी मुळ शब्दांची जागा इंग्रजी शब्दांनी घेतलेली आहे,आणि तेच त्या ठिकाणी वापरणे संयुक्तीक ठरते.
हा लेख लिहिण्याचे मुळ प्रयोजन,आजच गूगल Stats पाहिले आणि असे आढळले की वाचकसंख्या एका महिन्यात 20,522 झाली आहे,खरच समाधान वाटावे अशी घटना होती,आपण जे लिहितो आहे ते कोणी तरी वाचते,वापरून पाहते हे सुद्धा त्या निमित्ताने आणि वाचकांच्या प्रतिक्रिया वाचून कळले.
याच महिन्यात indiblogger वर रजिस्टर झालो आणि पहिल्यांदा मला indiRank मिळाली ती ही ७१...हे सर्व तुम्हा वाचकांमुळेच शक्य झाले आहे... :-) पहिल्या प्रयत्ना मध्ये एका मराठी ब्लॉगला ७१ indiRank मिळाली लवकरच मी ती ९०-१०० च्या दरम्यान घेवून जाण्याचा नक्की प्रयत्त्न करीन.
पुन्हा एकदा,धन्यवाद मित्रांनो,असेच सहकार्य करत राहा आणि लिखाणाला प्रतिक्रिया नक्की द्या..करण तुमच्या प्रतिक्रिया वाचल्या की लिखाणाची उमेद सुद्धा वाढते...सतत काहीना काही नविन लिहायची प्रेरणा मिळते.
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर.

अभिनंदन ! ...लगे रहो !
ReplyDeleteधन्यवाद विश्व :-)
ReplyDelete