५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

१५ मार्चला फेसबूक बंद होणार का?

काही दिवसांपासून फेसबूकच्या वॉलवर मित्रांशी चर्चा करताना ही बातमी वार्‍याच्या वेगाने पसरते आहे की १५ मार्चला फेसबूक बंद होणार का? ..मग आमच्या मित्रपरिवारचे काय होणार या पासून यापुढे आम्ही फेसबूक वर घालवलेले दिवस misssss करू इतपर्यंत खमंग चर्चा सुरु आहेत.

१५ मार्चला फेसबूक बंद होणार का? बंद होणार का? आणि झाले तर तुम्ही काय करणार मित्रांनो?
 

weeklyworldnews या वेबसाईट ने ही बातमी दिली आहे यासाठी त्यानी फेसबूकचा निर्माता Mark Zuckerberg याचे बोलणे पुरावा म्हणून दिले आहे.बातमी मध्ये त्याच्या म्हणण्यानुसार," साईटचा व्याप दिवसेंदिवस वाढतो आहे,आणि त्यामुळे साईट सांभाळणे कठिण जात आहे.याचा माझ्या रोजच्या आयुष्यावर परिणाम होत आहे.म्हणून मार्च मध्ये फेसबूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल.इत्यादी."
मुळ बातमी अशी आहे,
"PALO ALTO, CA –Mark Zuckerberg announced that Facebook will be shut down in March. Managing the site has become too stressful.

“Facebook has gotten out of control,” said Zuckerberg in a press conference outside his Palo Alto office, “and the stress of managing this company has ruined my life. I need to put an end to all the madness.”

Zuckerberg went on to explain that starting March 15th, users will no longer be able to access their Facebook accounts.

“After March 15th the whole website shuts down,” said Avrat Humarthi, Vice President of Technical Affairs at Facebook. “So if you ever want to see your pictures again, I recommend you take them off the internet. You won’t be able to get them back once Facebook goes out of business.”
etc.

ही बातमी वाचून तुमचा गोंधळ उडाला, आता काय होणार याचा विचार करत आहात?

काही काळजी करायचे कारण नाही कारण इंटरनेट वर अफवा कश्या पसरतात याचे हे उत्तम उदाहरण आहे.weeklyworldnews ही साईट किंवा हिच्या सारख्या अनेक वेब साईट नेट वर आहेत, ज्या प्रसिद्धी मिळवण्यासाठी अश्या अतिरंजित बातम्या मुद्दाम पसरवत असतात.
आणि हे या गोष्टीचे उत्तम उदाहरण आहे की अफवा पसरायला वेळ लागत नाही. :-) लोक विचार न करता अफवां वर विश्वास ठेवतात.
त्यामुळे तुम्ही स्वत: अश्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवण्यात सहभागी होवू नका.
थोडा सारासार विचार केला की अश्या अफवांचा फोल पणा लक्षात येतो...पण अश्या अफवा कधी कधी एखादी कंपनी बुडवू शकतात किंवा एखाद्याचे आयुष्य सुद्धा.
म्हणून सावधान,काळजी घ्या.

तरीही यदाकदाचित भविष्यात फेसबूक अथवा सोशल नेटवर्किग बंद झाले तर?? काय कराल?

मित्रांनो अश्या भ्रामक जगापेक्षा तुमचे खर्‍या आयुष्यातले कुटूंब,सगेसोयरे,मित्रमंडळी जास्त महत्त्वाची आहेत,त्याना वेळ द्या,त्यांच्या सोबत वेळ घालवा..कारण वेळ प्रसंगी तेच उपयोगी पडतात..फेसबूक वरची प्रोफाईल नाही.

धन्यवाद.
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर


CO.CC:Free Domain


गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment