Audio/Video शेअर करने आता सोशल नेटवर्किगमुळे फारसे कठीण राहिलेले नाही...आता कोणी ही ते सहज करू शकतो,पण जेव्हा ते चलचित्र अथवा आवाज रेकॉर्ड करायची वेळ येते,तेव्हा ते जरा किचकट काम असते.
पण आता SMRecorder या फ़्री सॉफ्ट्वेअर मुळे audio, video (तुमच्या वेबकॅम अथवा संगणकावर) रेकॉर्ड करणे सहज,सोप्पे झाले आहे. तुम्ही ते फ़्री सॉफ्ट्वेअर
SMRecorder या लिंकवर डाउनलोड करू शकता.
Recording कशी कराल?
१)प्रथम ते सॉफ्ट्वेअर
SMRecorder या लिंक वरून डाऊनलोड करून इनस्टॉल करा.
२)एकदा इनस्टॉल झाल्यावर प्रोग्राम सुरु करा, तसे केल्यावर चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे एक छोटीशी विंडो ओपन होईल.
३)New Recording Task वर क्लिक केल्यावर तुम्हाला Capture Type च्या drop-down menu मध्ये खालील ३ पर्यांय दिसतील.
* Desktop Video – तुमच्या संगणकाच्या स्क्रीन वरील प्रत्येक हालचाल Record करण्यासाठी या पर्यायाचा वापर करता येईल.
* Camera Video – तुमच्या वेबकॅम मधून व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी,या पर्यायाचा वापर करता येईल.
* Desktop/Microphone Sound – तुमच्या microphone चा आवाज रेकॉर्ड करण्यासाठी,या पर्यायाचा वापर करता येईल.
video/audio settings पर्यांय वापरून तुम्हाला त्यात हवे ते बदल करता येतील.
चला तर मित्रानो हे सॉफ्ट्वेअर वापरून तुम्ही Audio/Video Recording चा आनंद घ्या.
तुमच्या स्वत:चे Audio/Video प्रेजंटेशन तयार करण्यासाठी हे खुप उपयोगी सॉफ्ट्वेअर आहे.मुख्य बाब म्हणजे ते फ़्री आहे
धन्यवाद मित्रानो
उद्या भेटू या. :-)
नमस्कार,
मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.
1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.
**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.
**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.
कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट
४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे
savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra
धन्यवाद :-)
0 comments:
Post a Comment