हीच अडचण लक्षात घेवून,त्यावर मात करण्याची सोय Indian Postal Department ने केली आहे. Indian Postal Department त्यांच्या पोस्ट ऑफिस मधून address proof सोबत photo id card देण्याची सोय केली आहे. ते कार्ड मिळवायची पद्धत सुद्धा साधी सोप्पी आहे.
खाली दिलेल्या माहितीचा वापर करून तुम्ही ते सहज मिळवू शकता.
१)प्रथम जवळच्या पोस्ट ऑफिस मधून address proof साठीचा form घ्या..जो फक्त १० रुपयाना मिळतो.
२)form मध्ये संपुर्ण माहीती भरा आणि मग तो form जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये २४० रुपयांच्या फी सोबत जमा करा.
३)त्यानंतर तुमच्या पत्त्याची शहानीशा करण्यासाठी Postal Department तर्फे एक postman तुमच्या घरी येईल(तुम्ही दिलेल्या पत्त्या वर)
४)एकदा का तुमच्या पत्त्याची शहानीशा झाली..की काही काळाने तुम्हाला तुमचे address id card मिळेल.
५)संपुर्ण प्रक्रियेला जवळ जवळ २ महिन्याचा कालावधी लागतो.
येणारा खर्च:
१)form फी : १० रुपये.
२)कार्डसाठी द्यावी लागणारी फी:२४० रुपये.
३)renewal फी:१४० रुपये.
४)duplicate :९० रुपये
उपयोग:
१)या कार्डचा वापर तुम्ही identity proof आणी address proof म्हणून करू शकता.
२)हे कार्ड ३ वर्षापर्यंत वैध्य आहे,त्या नंतर त्याचे नुतनीकरन(renewal)करावे लागते.
३)सर्वच पोस्ट ऑफिसमध्ये ही सेवा उपलब्ध नाही आहे..अधिक माहिती साठी तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये चौकशी करावी.
या सेवेबद्दलची अधिक माहिती तुम्ही official Post Office Guide –Section 63 (page no. 65) वर वाचू शकता.
धन्यवाद.
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर
Thanks for very good informaion.
ReplyDeleteधन्यवाद.. :-)
ReplyDelete