५००च्या आसपास लेख असल्यामुळे विभागवार नोंदी शोधण्यासाठी अनुक्रमणिकेचा वापर करा (जुन्या पोस्टमधील adf.ly लिंक्स उघडत नसतील तर त्या लिंक उघडण्यासाठी http:// ऐवजी https:// वापरा.उदा. https://adf.ly )

तुमच्या घरचे वायरलेस नेटवर्क(Wi-Fi) कसे सुरक्षित ठेवाल?(भाग- १)


नुकतेच जे वाराणसीमध्ये ब्लास्ट झाले त्यात असे आढळून आले कि स्फोटाची जवाबदारी घेणारे मेल हे एका व्यक्तीचे वायरलेस कनेक्शन हॅक करून पाठवण्यात आले.वायरलेस कनेक्शन जर हॅक होत असेल तर तुमच्या घरचे वायरलेस नेटवर्क कसे सुरक्षित आहे का??? नसेल तर ते कसे सुरक्षित ठेवावे याची माहिती आज आपण या लेखातून करून घेणार आहोत.



वायरलेस नेटवर्क म्हणजे काय?
 नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे..सोप्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर ज्या  कनेक्शनसाठी वायरचा उपयोग  होत नाही...ते वायरलेस...वायरलेस कनेक्शनचा वापर आपण लॅपटॉप,संगणक सारख्या उपकरणात आपण करतो..कारण वायरने नेट जोडण्याची कटकट नसल्याने ते आपण घरात कुठेही बसून आरामात वापरू शकतो.


पण या नेटवर्कचे जसे फायदे आहेत तसेच तोटे सुद्धा आहेत.वायर नेटवर्क मध्ये तुमची बॅन्डविथ चोरणे कठिण असते..परंतू वायरलेस नेटवर्क मध्ये तुमच्या इंटरनेटची बॅन्डविथ वापरून तुमचा शेजारी अथवा तुमच्या घराबाहेरची कोणतीही व्यक्ती तुमचे नेट वापरू शकते.
यालाच piggybacking असे ही म्हणतात.


खालील कारणामुळे ते जास्त धोकादायक आहे.

१)जर तुम्ही पोस्ट्पेड प्लॅन वापरत असाल तर तुम्हाला तुमच्या वापरापेक्षा कित्येक पटीने जास्त बिल येवू शकते.


२)जर दुसरे कोणी तुमचे वायरलेस नेटवर्क चोरून वापरत असेल तर इंटरनेटची बॅन्डविथ शेअर होत असल्यामुळे तुम्हाला इंटरनेट स्पीड कमी मिळतो.


३)आणि सर्वात मोठा धोका असतो तो हॅकिंगचा..जर तुमचे वायर नेटवर्क हॅक करून कोणी  तुमची खाजगी माहीती चोरली,तिचा वाईट वापर केला तर तुम्ही काय कराल???

अश्या काही घटना घडल्या आहेत उदाहरणार्थ वाराणसीच्या स्फोटाची जवाबदारी घेणारा मेल हा असेच असुरक्षित वायरलेस नेटवर्क हॅक करून केला गेला होता..आणि हकनाक निरपराध माणसे यात गोवली गेली होती..हे तुमच्या आमच्या बाबतीत ही घडू शकते..जर तुमचे वायरलेस नेटवर्क सुरक्षित नसेल तर.


Wireshark नावाचे packet sniffing टूल वापरून कोणीही असे असुरक्षित वायरलेस नेटवर्क हॅक करू शकते...हे packet sniffing टूल असुरक्षित वायरलेस नेटवर्क मधून जे ट्राफिक जाते,उदाहरणार्थ तुमच्या वेबबाऊसर मधल्याcookies,forms आणि इतर HTTP requests स्कॅन करते.

आता विचार करा तुमचे वायरलेस नेटवर्क सुरक्षित आहे का??? उत्तर नाही असे आहे??? घाबरू नका..योग्य ती काळजी घेतली तर तुमचे घरातले वायरलेस नेटवर्क सुरक्षित करणे फारसे कठिण नाहि.तुमच्या घरच्या वायरलेस नेटवर्कला हॅकिंग पासून कसे सुरक्षित करायचे ते आपण पुढच्या भागामध्ये पाहू.
धन्यवाद :-)

तुमच्या घरचे वायरलेस(Wi-Fi) नेटवर्क कसे सुरक्षित ठेवाल? भाग २ 

CO.CC:Free Domain
गुगलप्लसवर शेअर करा

About प्रशांत दा.रेडकर

नमस्कार,

मी प्रशांत दामोदर रेडकर.मी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर आहे.

1)मनात माझ्या २)स्पर्श नवा ही माझी दोन चारोळ्यांची पुस्तक प्रकाशित झालेली आहेत.

**तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे बुकगंगा विश्वसाहित्य संमेलन २०१२ मध्ये मला आवडता ब्लॉगर हा पुरकार मिळालेला आहे.**ABP माझाच्या "ब्लॉग माझा २०१५"च्या स्पर्धेमध्ये माझ्या या ब्लॉगला "दुस-या क्रमांकाचे" पारितोषिक मिळाले आहे.

**गायक सुबोध साठे यांनी त्याच्या "अजूनही कळेचना" या अल्बममध्ये मी लिहिलेले "तू गेलीस तेव्हा" हे गाणे गायलेले आहे.

कोडींग करणे हा माझा छंद आहे..त्याच छंदामुळे मी सध्या दोन मराठी सोशल नेट्वर्किंग साईटच्या निर्मिती मध्ये गुंतलो आहे.1)marathifanbook.com मराठी सोशल नेटवर्क 2)chivchivat.com मराठी सोशल नेटवर्क ३)marathimy.comमराठी विवाह संबंधित वेबसाईट

४)माझी मैत्रीण आणि गायिका सावनी रवींद्र हिची वेबसाईट आणि Android App सुद्धा मी डिजाईन केली आहे

savaniravindra.com वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि app डाउनलोड करण्यासाठी हि लिंक वापरा com.savani.ravindra

धन्यवाद :-)

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

Post a Comment