गूगलने त्यांच्या Adsense प्रोग्रामच्या Terms and Conditions मध्ये बदल केले आहे....त्यांच्या म्हणण्या नुसार Adsense Adsense publishers नी या पुढे त्यांच्या ब्लॉग अथवा वेब साईट वर "Privacy Policy" लिहिणे गरजेचे आहे.
त्यांच्याच शब्दामध्ये सांगायचे झाले तर, Terms and Conditions मध्ये त्यांनी केलेले बदल खालील प्रमाणे आहेत.
त्यांच्याच शब्दामध्ये सांगायचे झाले तर, Terms and Conditions मध्ये त्यांनी केलेले बदल खालील प्रमाणे आहेत.
"You must have and abide by an appropriate privacy policy that clearly discloses that third parties may be placing and reading cookies on your user’s browser, or using web beacons to collect information, in the course of ads being served on your website. Your privacy policy should also include information about user options for cookie management."
Update: 23 March 2009
तुमच्या ब्लॉगसाठी Privacy Policy लिहिणे तुम्हाला कठिण वाट्त असेल? तर तुम्ही खाली दिलेल्या Privacy Policy Generator चा वापर करून तुम्ही तुमच्या ब्लॉग साठी अथवा वेबसाईट साठी Privacy Policy लिहू शकता.
१)प्रथम "Privacy Policy Generator " या लिंक वर क्लिक करून Policy Generator ओपन करा.
२)जे पान उघडेल त्यावर प्रथम तुमच्या ब्लॉगचे नाव,आणि ई-मेल आयडी ही माहिती भरा.
३)मग पुढचा पर्याय आहे तसाच राहू द्या आणि त्या खाली असलेल्या पर्याया मध्ये तुमच्या ब्लॉग वर ज्या ADVERTISER च्या जाहिराती दाखवल्या जातात त्यांचे नाव निवडा...त्या नंतर "Create My Privacy Policy" वर क्लिक करा.
विशेष सुचना: तुमच्या जाहिरात कंपनीचे नाव त्या यादीमध्ये नसले तरी एकदा का तुमची Privacy Policy तयार झाली की तुम्ही त्यात बदल करून ते नाव टाकू शकता..उदा.गूगलच्या जागी इतर कोणत्याही जाहिरात कंपन्या.ज्यांच्या जाहिराती तुमच्या ब्लॉगवर तुम्ही ठेवता :-)
४)एक नविन विंडो उघडेल त्यात तुमच्या ब्लॉगसाठी लिहिलेली Privacy Policy असेल...ती कॉपी करा...आणि त्यात तुम्हाला हवे ते आवश्यक बदल करून...तुमच्या ब्लॉग मध्ये एक Privacy Policy नावाचा पोस्ट तयार करून पब्लिश करा.
५)या Privacy Policy नावाचा पोस्टची लिंक तुम्ही तुमच्या ब्लॉगच्या होम पेज(मुख्य पान) वर तळाला अथवा साइड बार(Sidebar)मध्ये देवू शकता.
तळटिप: मी काही मराठी ब्लॉग वर Google Adsense द्वारे दाखवल्या जाणार्या जाहीराती पाहिल्या आहेत.जे Google Adsense प्रोग्रामच्या Terms and Conditions च्या विरुद्ध आहे.
गुगलला याची माहिती मिळाल्यास तुमचे Adsense Account बॅन होईल.
आजसाठी इतकेच..परत भेटू या नविन वर्षी नविन काही माहिती घेवून......
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला येणार्या नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!! :-)
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर :-)
माझ्या पण साईट वर काही ads दिसत नाही बहतेक त्याचामुलेच असावे. जरा चेक करून सांगू शकतो का ? मी पण आजच प्रायवसी पोलिसी टाकून ठेवतो.
ReplyDeleteगूगलच्या जाहिराती तुम्ही तुमच्या मराठी ब्लॉग वर ठेवू शकत नाही..तस केल्यास तुमचे गूगल ADSENSE अकाउन्ट तुम्हाला गमवावे लागेल..फोटो ब्लॉग इंग्रजी टायटल सोबत असल्याने त्यावर जाहीराती ठेवण्यास काही हरकत नाही
ReplyDeleteइतर मराठी ब्लॉग साठी खाली दिलेली लिंक वापरून दुसर्या एका जाहिराती करणार्या कंपनीचे अकांउन्ट तुम्ही मिळवू शकता..ही खास भारतीय ब्लॉगर्स साठी असलेली कंपनी आहे.
अधिक माहितीसाठी हि लिंक बघा.
http://www.admaya.in/index.php?r=3142
धन्यवाद
:-)