तुम्हा सर्वांच्या नुकतीच घडलेली एक गोष्ट लक्षात असेल ती म्हणजे Government of India ने RIM (Research In Motion) ला त्यांच्या BlackBerry messaging services च्या encryption key आहेत, त्या भारतीय सुरक्षा एजेंसीना वापरू द्याव्या असे सांगितले होते. ३० जानेवारी २०११ पर्यंत जर त्यांनी असे केले नाही तर BlackBerry devices भारतामध्ये बॅन होवू शकतात.
Indian Government ने Skype ला सुद्धा त्यांचे लोकल servers भारतामध्ये सुरु करायला सांगितले आहे,म्हणजे मग भारतीय सुरक्षा एजेंसीना Skype वरून जे संभाषण होते त्याच्यावर लक्ष ठेवणे सोप्पे जाईल.Skype ने जर तसे केले नाही,तर त्यांच्यावर सुद्धा भारतामध्ये बंदी येवू शकते.
Government of India ने गूगलला त्यांच्या जीमेल सेवेच्या encryption key,भारतीय सुरक्षा एजंसी सोबत शेअर करायला सांगितले आहे.पण Google India products chief Vinay Goel यांच्या म्हणण्या नुसार कोणत्याही परिस्थितीत गूगल जीमेलच्या encryption key शेअर करणार नाही.
त्यांचे असे ही म्हणणे आहे की "We are not advocating non-compliance and are definitely open to offering the Indian government access to encrypted Gmail communication in the event of a large-scale risk to human life and property."
म्हणजे मोठया प्रमाणात जिवित आणि वित्तहानी होणार असेल त्याच वेळी गूगल,भारत सरकारला encrypted Gmail संभाषण पाहण्याची संधी देईल.
भारत सरकारला गूगलचे हे म्हणणे मान्य नाही,याचे कारण,मोठे धोके हे कोणालाच आधी सांगून येत नसतात आणि हे धोके टाळता यावेत यासाठीच भारतीय सुरक्षा एजंसीना जीमेलच्या माध्यमातून होणार्या संदेशांच्या देवाण-घेवाणी वर लक्ष ठेवायचे आहे.
जर Government of India आपल्या म्हणण्यावर कायम राहिले आणि गूगलने, भविष्यात त्यांच्या निर्णयात योग्य तो बदल केला नाही तर Government of India जीमेल वर बंदी आणू शकते.
असे झाले, तर तुम्ही Gmail ला कोणता पर्यांय वापरणार??
गूगल काय उपाय शोधणार??? याची उत्तरे येणारा काळच देईल. :-)
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर
0 comments:
Post a Comment