जर तुमचे जीमेल वर २-३ अकांउट असातील आणि जर तुम्हाला त्या अकांउटचे व्यवस्थापन अधिक परिणामकारक पद्धतीने करायचे असेल तर तुमच्यासाठी जीमेल एक नविन फिचर घेवून आले आहे त्याचे नाव आहे "Email Delegation"
Email Delegation चा वापर करून तुम्ही दुसर्या कोणाही जीमेल यूसरला तुमचे जीमेल अकांउटचे व्यवस्थापन करण्याची परवानगी देवू शकता.
Email Delegation चा वापर करून दुसरा कोणीही जीमेल यूसर (ज्याला तुम्ही तुमचे अकांउट वापरायची परवानगी दिली आहे) तुमच्या inbox मधले मेल चेक करून तुम्हाला आलेल्या इ-मेलला तुमच्या वतीने रिप्लाय देवू शकतात.
कोणी तुमचे जीमेल चॅट वापरले किंवा तुमच्या अकांउट्च्या सेटिंग्स बदलून तुमचे अकांउट डिलीट केले अथवा पासवर्ड बदलला तर काय होईल असे किती तरी प्रश्न तुमच्या मनात आले असतील....पण घाबरू नका Email Delegation चा वापर करून तुम्ही ज्या यूसरला तुमचा inbox वाचायची आणी इ-मेल ला रिप्लाय द्यायची परवानगी दिली आहे तो फक्त याच गोष्टी करू शकेल....तुमचे जीमेल चॅट सारखे फिचर वापरणे अथवा तुमच्या अकांउटच्या सेटिंग्स बदलायची परवानगी त्याना नसेल :-)
तुमचे अकांउट सांभाळणारी व्यक्ती एकाच वेळी स्वत:चे आणि तुमचे अकांउट सांभाळू शकते..तसेच एका अकांउट मधून दुसर्या अकांउट मध्ये जाणे ही तितकेच सोप्पे आहे.
तुम्ही एका अकांउट वर लॉग आऊट झालात तर तुम्ही बाकिच्या अकांउटवरून सुद्धा आपोआप लॉग आऊट होता.
जर तुम्हाला भविष्यात तुमच्या अकांउटचा access दुसर्या कोणाला द्यायचा नसेल तर तुम्ही असे delegation account डिलीट करू शकता.
Email Delegation साठी तुमच्या जीमेल अकांउट्च्या सेटिंग्स मध्ये काय बदल करावे लागतील त्याची आता आपण माहिती करून घेवू या.
१)तुमच्या जीमेल अकांउट्च्या सेटिंग्स वर क्लिक करा
२)तिथे तुम्हाला Accounts and Import टॅबच्या खाली
Grant access to your account नावाचा पर्याय मिळेल..तिथे Add another account पर्यायावर क्लिक करा
३)जी नविन विंडो ओपन होईल त्या मध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीला तुमच्या अकाऊटचा access द्यायचा आहे त्याचा इ-मेल आयडी इंटर करा आणि next step वर क्लिक करा.
४)तुम्ही आताच जो इमेल आयडी add केलात,त्या आयडी वर एक ईमेल confirmation link सोबत जाईल..त्या यूजरने तुमची विनंती मान्य केली तर त्याच्या अकांउटच्या सेटिंग्स टॅबच्या शेजारी त्याना ड्रॉपडाउन मेनू मध्ये तुमचा इमेल आयडी दिसू लागेल...ज्यावर क्लिक करताच एका अकांउट मधून दुसर्या अकांउटमध्ये जाणे सहज शक्य होईल.
अधिक माहिती साठी तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता
धन्यवाद
तुमचा मित्र
प्रशांत दा.रेडकर
0 comments:
Post a Comment