आता काय करावे बरे??? घाबरू नका..यावर पण उपाय आहे..तो म्हणजे तुमच्या फेसबूक अकाउंटचा बॅकअप घेणे..फेसबूकने तशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. :-)

तुमच्या फेसबूक अकाउंटचा "Account Settings" मध्ये जावून "Download Your Information" पर्यांया समोरील " learn more" वर क्लिक करा.
जी नविन विंडो ओपन होईल त्यात तुम्हाला "Get a copy of the data you've put on Facebook " व त्या संबंधीची माहिती वाचता येईल..त्याच पानावर तळाला "Download" नावाचा पर्यांय दिसेल..त्यावर क्किक करा.
आता "Request My Download" नावाची एक नविन विंडो ओपन होईल.
तिथे ""Download" या पर्यांया वर क्लिक केल्यावर "You will receive an email when your archive is ready for download" असा मजकूर फ़ेसबूक मार्फत दाखवला जाईल.
आता काही वेळाने तुमच्या इमेल अकाउंट वर फेसबूक मार्फत एक मेल येईल त्यामध्ये तुमच्या अकांउटचा संपूर्ण बॅकअप ".zip" Format मध्ये असेल..
तो तुम्ही डाउनलोड करून सुरक्षित ठिकाणी ठेवू शकता..फक्त या गोष्टीची काळजी घ्या की हि फाईल कोणाच्या हाती लागणार नाही.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर :-)
0 comments:
Post a Comment