आपल्या सर्वांना रोज वेगवेगळ्या सेवा पुरवणार्यांकडून उदा. बॅंक,मोबाईल फोनच्या कंपन्या इत्यादी कडून SMS येत असतात.ते SMS वाचल्यावर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल ती म्हणजे त्या SMS मध्ये काही ठराविक आद्याक्षरे आणि कोड असतात..ते वाचून नेमके आपल्याला कळत नाही हा SMS कोणी कुठून पाठवला आहे.
उदा> XY-ServiceProvider असे SMS च्या सुरुवातीला काहीतरी असते.
मला आताच एक SMS आला त्याच्या सुरुवातीला कोड होता
DM-My Music
म्हणून मी असे SMS कसे,कुठून येतात त्याचा शोध घ्यायचे ठरवले आणि असे दिसून आले कि मला SMS हा दिल्लीच्या ,महानगर टेलिफोन निगम यांच्या नेटवर्क मधून आलेला आहे.
तुम्ही विचार कराल नेमके या कोडचा अर्थ काय? आणि तो असा का बरे SMS टाकलेला असतो...तर त्या मागचे कारण म्हणजे तुम्हाला mobile phone spam पाठवणार्या bulk SMS senders पासून तुम्हाला वाचवणे.
TRAI (Telecom Regulatory Authority of India)ने bulk unsolicited SMS पाठवणार्याना,हा कोड SMS मध्ये पाठवणार्याच्या नावाच्या (sender name)जागी लिहिणे सक्क्तीचे केले आहे..याचे कारण आहे,जर या पैकी कोणी तुम्हाला तुमच्या इच्छेविरुद्ध SMS पाठवत असेल किंवा बेकायदेशीर (illegal)माहिती पाठवण्यासाठी याचा उपयोग करत असेल तर तुम्हाला त्यांचे ठिकाण शोधणे सहज शक्य व्हावे.
आपल्यापैकी बर्याच जनाना याची माहिती नसते...चला तर मग हे कसे शोधायचे ते पाहू या :-)
Bulk SMS Sender ना कसे शोधाल?
Bulk SMS Sender चे लोकेशन काय आहे याची सर्व माहिती तुम्हाला आलेल्या SMS मधील कोडच्या पहिल्या २ शब्दांमध्ये लपलेले असते.
उदा. XY-ServiceProvider
X- हा service provider च्या नावाचा कोड असतो
Y-हा कोड तुम्हाला SMS ज्या ठिकाणा वरून पाठवला जात आहे त्या ठिकाणाची माहिती देतो.
खालील तक्त्याचा वापर करून तुम्ही अश्या SMS पाठवणार्यांच्या service provider चे नाव आणि तुम्हाला SMS ज्या ठिकाणा वरून पाठवला जात आहे त्या ठिकाणाची माहिती मिळवू शकता.
उदा. मला आलेल्या SMS मध्ये कोड होता DM-My Music
D-दिल्ली मधल्या
M-महानगर टेलिफोन निगमच्या नेटवर्क मधून आलेला आहे.
पुन्हा भेटू या पुढच्या लेखात.
धन्यवाद.
तुमचा मित्र,
प्रशांत दा. रेडकर :-)
Hi Prashant,
ReplyDeleteCan we find out name of the owner of the mobile no?
Please please please tell me..
Thanks,
---Priya.
Hi Priya,
ReplyDeleteसद्ध्या तरी भारतामध्ये आपण मोबाईलचे लोकेशन,त्यांचे service provider कोण आहेत याची माहिती घेवू शकतो..ते कसे शोधायचे ते मी पुढच्या लेखामध्ये लिहिन...जर कोणी त्या नंबर वरून त्रास देत असेल तर तुम्ही स्थानिक पोलिस स्टेशनची मदत घेवू शकता...म्हणजे ते त्या नंबरच्या service providerशी संपर्क करून त्याचे नाव,पत्ता घेवून त्याला शोधू शकतात.