तुम्ही जेव्हा नेटवर काही शिकत असता तेव्हा त्या विषयाबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला अनेक ऑनलाइन सुविधा वापरून बघाव्या लागतात,त्यासाठी बर्याच ठिकाणी तुम्हाला तुमचा इ-मेल आयडी वापरून रजिस्ट्रर व्हावे लागते तरच तुम्हाला त्या सेवेचा वापर करता येतो..पण बर्याच वेळा आपण अश्या ठिकाणी आपला इमेल आइडी नोंदवून नंतर त्या सेवेबद्दल,त्या साईटबद्दल विसरून सुद्धा जातो...आणि मग तुमच्या इमेल आयडी वर spam मेलचा मारा सुरु होतो...दिवसाला १००+ मेल येतात..ते डिलीट करून तुम्ही कंटाळून जाता.
बहुतेक जाणकार लोक यावर उपाय म्हणून अश्या ठिकाणी आपला इमेल आयडी नोंदवण्यासाठी स्वत:चा वापरात नसलेला दुसरा कमी महत्त्वाचा इमेल आयडी वापरतात,पण नवख्या लोकांची जाम तारांबळ उडते.
बहुतेक जाणकार लोक यावर उपाय म्हणून अश्या ठिकाणी आपला इमेल आयडी नोंदवण्यासाठी स्वत:चा वापरात नसलेला दुसरा कमी महत्त्वाचा इमेल आयडी वापरतात,पण नवख्या लोकांची जाम तारांबळ उडते.
यावर उपाय काय?
उपाय सोप्पा आहे...असा तात्पुरता इमेल आयडी जो तुम्ही तुम्ही "फ्री" मध्ये बनवून ६० मिनिटांसाठी वापरू शकता आणि जो ६० मिनिटाच्या वापरा नंतर आपोआप डिलीट होतो.
असा इमेल आयडी स्पॅम मेल पाठवणार्या कंपन्या विरुद्ध उत्तम उपाय आहे ज्यांचा असा समज असतो की असे मेल पाठवून त्यांचा व्यवसाय वाढेल अथवा त्यांना आर्थिक फायदा होईल.
Guerrilla Mail ही अशी ऑनलाईन सर्विस आहे जी तुम्हाला हवा असलेला तात्पुरता इमेल आयडी बनवून देते ज्यावर तुम्ही ६० मिनिट पर्यंत येणारे मेल पाहू शकता आणि ६० मिनिटाचा वेळ संपला की तो मेल आयडी आपोआप डिलीट होतो...त्यामुळे तुम्हाला येणार्या स्पॅम मेल पासून आपोआप संरक्षण मिळते.
हा इमेल आयडी तुम्ही RSS feed वापरून सुद्धा subscribed करू शकता,जेणे करून तुम्हाला आलेले मेल तुम्ही पटकन पाहू शकता आणि त्यासाठी तुम्हाला त्या साईटचे पेज reload करायची गरज उरत नाही.
हा इमेल आयडी ६० मिनिटां नंतर आपोआप डिलीट होतो..पण गरज असल्यास तुम्ही त्या इमेल आयडीची मुदत पुढील ६० मिनिटांच्या वापरासाठी वाढवून घेवू शकता.
तुमचे काम संपल्या वर तुम्ही तो इमेल आयडी एक तासाची मुदत संपण्या आधी सुद्धा डिलीट करू शकता...त्यासाठी Forget Me या पर्याया वर तुम्हाला क्लिक करावे लागेल.
आजसाठी इतकेच उद्या पुन्हा भेटूया नविन माहितीसह.
धन्यवाद,
तुमचा मित्र,
प्रशांत दा.रेडकर
चांगली माहिती दिली.
ReplyDeleteधन्यवाद.. :-)
ReplyDelete