तुमच्या घरचे वायरलेस(Wi-Fi) नेटवर्क कसे सुरक्षित ठेवाल?(भाग-३)
मित्रांनो आधीच्या दोन भागांमध्ये आपण तुमचे वायरलेस नेटवर्क कसे असुरक्षित असते आणि ते कसे सुरक्षित कराल? याची माहिती घेतली.
तुमच्या घरचे वायरलेस नेटवर्क कसे सुरक्षित ठेवाल?(भाग१)
तुमच्या घरचे वायरलेस नेटवर्क कसे सुरक्षित ठेवाल?(भाग२)
त्याच लेखाचा ३ रा भाग मी आता लिहितो आहे.
आता पर्यंत आपण पाहिले की खाली दिलेल्या माहितीचा वापर करून तुम्ही तुमचे वायरलेस नेटवर्क सुरक्षित ठेवू शकता.
१)तुमच्या router च्या सेटिंग बदला.
२)तुमच्या router चा पासवर्ड बदला.
३)तुमच्या नेटवर्कचे "SSID(वायरलेस नेटवर्क नाव)" नाव बदला.
४)नेटवर्क Encryption चा वापर करा.
आता पुढची स्टेप म्हणजे
५)"मॅक (MAC) addresses" फिल्टर करा:
तुमच्या कडे लॅपटॉप असो अथवा Wi-Fi असलेला मोबाईल फोन तुमच्या प्रत्येक वायरलेस उपकरणाला एक unique MAC address असतो...सोप्प्या भाषेत सांगायचे झाले तर ती झाली त्या उपकरणाची नेटच्या जगातील ओळख आहे.तुमचे वायरलेस कनेक्शन अधिक सुरक्षित करण्यासाठी, तुम्ही तुमच्या सर्व वायर्लेस उपकरणांचे मॅक (MAC) addresses तुमच्या वायरलेस router च्या settings मध्ये सेव्ह करा,त्याने काय होईल?? तर फक्त तिच उपकरणे तुमच्या वायरलेस नेटवर्कचा उपयोग करू शकतील.
मॅक (MAC) address हा त्या नेट्वर्क उपकरणात नोंदलेला असतो...खरतर मॅक (MAC) address हा "spoof" करता येतो..आता विचाराल spoof म्हणजे काय? तर MAC spoofing ही अशी पद्धत आहे जिचा वापर करून हॅकर तुमच्या वायरलेस उपकरणाचा मॅक (MAC) address बदलू शकतात.पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्याला तुमच्या वायरलेस नेट्वर्क मधल्या संगणकापैकी एखाद्या संगणकाचा मॅक (MAC) address माहित असेल.
"मॅक (MAC) addresses" फिल्टरींग करण्यासाठी काय करावे?
*प्रथम तुमच्या घरच्या वायरलेस नेट्वर्क मध्ये तुम्ही जी उपकरणे वापरू इच्छिता त्यांची एक लिस्ट करा
*त्यांचा मॅक (MAC) address शोधा आणि तुमच्या router च्या administrative settings मधल्या MAC address filtering मध्ये ते add करा.
*तुमच्या संगणकाचा मॅक (MAC) address शोधण्यासाठी त्याचा "Command Prompt " उघडा आणि ipconfig /all टाईप करा
उदा:
c:\> ipconfig /all
असे केल्याने तुम्हाला त्याचा मॅक (MAC) address कळेल.
*तुमच्या वायरलेस मोबाईलचा अथवा इतर पोर्टेबल उपकरणाचा मॅक (MAC) address तुम्हाला त्यांच्या नेट्वर्क settings मध्ये मिळेल.
हॅकर काय करतात?
जर त्यांना तुमच्या संगणकाचा मॅक (MAC) address माहित असेल तर ते त्यांच्या संगणकाचा मॅक (MAC) address बदलून तुमच्या वायरलेस नेट्वर्क मध्ये प्रवेश करू शकतात.
Nmap नावाचे sniffing tool वापरून कोणीही तुमच्या उपकरणाचा मॅक (MAC) address जाणून घेवू शकतो आणि MAC Shift नावाचे टूल वापरून स्वत:च्या उपकरणाचा मॅक (MAC) address तुमच्या मॅक (MAC) address ने बदलून तुमच्या नेटवर्क मध्ये प्रवेश करू शकतो.
६)तुमच्या घरच्या वायरलेस सिग्नलची रेंज कमी करा:
समजा तुमच्या वायरलेस router ची रेंज जास्त आहे आणि तुम्ही छोट्याशा अपार्टमेन्ट मध्ये राहात असाल तर तुम्ही वायरलेस सिग्नलची रेंज कमी करू शकता.त्यासाठी तुम्हाला तुमच्या router चा मोड "802.11g " असा बदलावा लागेल.
७)Anti-Wi-Fi Paint चा वापर करा:
Anti-Wi-Fi Paint चा वापर करून तुम्ही तुमच्या शेजारयाला तुमचे नेट वापरण्या पासून थांबवू शकता.Anti-Wi-Fi Paint मध्ये अश्या केमिकलचा वापर केलेला असतो ज्याने वायरलेस सिग्नलना तुमच्या घराबाहेर जाण्यापासून अटकाव केला जातो.
८)तुमच्या Router चे firmware अपडेट करा:
तुमच्या Router निर्मात्याच्या वेबसाईटवर तुम्ही वरचे वर जावून तुमच्या Router चे firmware अपडेट आहे का ते चेक करू शकता.
तुमचे सद्ध्याचे Router चे firmware वर्जन काय आहे ते तुम्ही तुमच्या Routerच्या "192.168.*."या dashboard वर चेक करू शकता.
आता पर्यंत आपण आपल्या घरचे वायरलेस नेट्वर्क कसे सुरक्षित करावे याची माहिती घेतली.
तुमचे नेट्वर्क सुरक्षित करण्यासाठी MAC Address filtering आणि WPA2 (AES) encryption याचा वापर करणे हाच एक उत्तम मार्ग आहे.
धन्यवाद.
0 comments:
Post a Comment