हे वयच अस असत...
कवी प्रशांत दा.रेडकर
हे वयच असं असत......,
आपुलकीने कोणी बोलणार भेटल,
की ते अगदी आपल आपल वाटत.
कारण...कारण हे वयच असं असत.
तिच्यासाठी आपण झुरावस वाटत,
तिला देखिल कोणी प्रेम करावस वाटत.
तासनतास तिला पाहत राहावसं वाटत.
कारण..कारण हे वयच असं असत.
नाही नाही म्हणता म्हणता..,
आपण गुंततच जातो.
गप्पांमध्ये धुंद होऊन..,
अगदीच रंगुन जातो.
अचानक तिची आपल्याला,
खुप काळजी वाटायला लागते.
ती देखील खुप जवळचा समजून,
मनातलं सर्वंच सांगते.
मनामनाचे अल्लड नाते...,
बघता बघता फुलत.
कारण????कारण???..
अहो कारण काय विचारता??
कारण..कारण हे वयच असं असत.
तिचा हात हाती घेताना..,
कसलीच लाज वाटत नाही.
तिला देखिल जवळ येताना,
कसलीच भीती वाटत नाही.
इतके जवळ येवून सुद्धा..,
कधी मर्यादा ओलांडत नसतं.
कारण..कारण हे वयच असं असत.
तिच त्याच ते गुपित..,
जेव्हा सर्वांना कळत.
चिडवण्याला सुरुवात होते अन,
एक निखळ नातं मरत.
तोडणे सोप्पे,जोडणे कठीण,
हे तेव्हाच फक्त कळत...
कारण???कारण????
अहो कारणं काय विचारता?
हे वयच असं असतं...
हे वय़च असं असतं.
- Blogger Comment
- Facebook Comment
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment