हॅकर कोण असतात?
कालच वाचनात आले की विश्वनिर्मीतीचे रहस्य शोधण्यासाठी जो प्रयोग सुरु आहे तो हॅक करण्याचा प्रयत्न झाला....एक हॅकर ग्रुप जो ग्रुप २६०० नावाने ओळखला जातो...त्यांनी या प्रोजेक्टशी संबंधीत कॉप्युटर सिस्टीम जवळजवळ हॅक केल्यात जमा होती.ही बातमी वाचुन तुमच्या ही मनात कुतुहल निर्माण झाले असेल की हे हॅकर कोण असतात?कसे काम करतात? तुमच्या मनातल्या या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा मी एक छोटासा प्रयत्न या लेखातून केला आहे.चला तर उत्तरांच्या शोधा मध्ये
कॉप्युटर हॅकिंग:
**********
संगणक आणि त्याचा नेटवर्क संसाधनांचा अनधिकृत पणे वापर करणे असा हॅकिंग या शब्दाचा अर्थ निघतो.
कॉप्युटर हॅकर:
***********
काहींच्या मते या शब्दाचा अर्थ "एक चतुर प्रोग्रामर" असा होतो...तर इतरांच्या मते "हॅकर ही अशी व्यक्ती आहे,जिच्या कडे कॉप्युटर सॉफ़्टवेअर चे कोड बदलण्याची क्षमता आहे. जी व्यक्ती सहज कोणत्याही संगणक प्रणाली मध्ये हवे तसे फेरफार करु शकते.
********************************************************************************
हॅकरचे सुद्धा काही प्रकार आहेत.
ते पुढील प्रमाणे:
**********
१)व्हाइट हॅट
२)ब्लॅक हॅट
३)ग्रे हॅट
१)व्हाइट हॅट हॅकर:
***********
य़ाना "एथिकल हॅकर" असे ही संबोधिले जाते.ही व्यक्ती आपल्या हॅकिंग मधल्या ज्ञानाचा उपयोग संगणक प्रणाली चा होणारा दुरुपयोग टाळण्यासाठी करते.तसेच असे करताना कोणताही गुन्हेगारी हेतू त्या मागे नसतो. सद्ध्या जगा मध्ये बऱ्याच कंपन्या,ज्याना आपली प्रणाली किती सुरक्षित आहे ,हे पडताळून पाहायचे आहे,त्या अश्या हॅकरना करारबद्ध करतात.त्या नंतर हे हॅकर त्या कंपनीची प्रणाली किती सुरक्षित आहे, त्यात काही उणिवा तर राहिलेल्या नाहित ना,याची पडताळणी करतात.याचा उपयोग कंपनीचे नेटवर्क अधिका अधिक सुरक्षित करण्यासाठी होतो.
सद्ध्या जगभर आणि भारता मध्ये सुद्धा "एथिकल हॅकिंग" चे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था उपलब्ध आहेत.
********************************************************************************
२)ब्लॅक हॅट :
**********
यांना क्रॅकर असे ही संबोधिले जाते.ही हॅकर या शब्दाची काळी बाजु आहे.अशी व्यक्ती जी आपल्या संगणक विषयक ज्ञानाचा उपयोग, गुन्हेगारी स्वरुपाच्या कारवाया करुन,वैयक्तीक फायदा मिळवण्यासाठी करते, ती याच सदरात मोडते.तुमच्या संगणक प्रणाली मधला वैयक्तीक माहितीचा साठा चोरने. उदा. तुमच्या क्रेडिट कार्डचे नंबर,साईट चे पासवर्ड चोरणे,सॉप्टवेअर चे सिरिअल नंबर क्रॅक करने, व त्याचा वापर तुमचे, तसेच सॉप्ट्वेअर कंपन्यांचे नुकसान करण्यासाठी करणे. या स्वरुपाच्या कारवाया हे हॅकर करतात.
********************************************************************************
३)ग्रे हॅट :
********
हा व्हाइट आणि ब्लॅकहॅकर च्या मधला प्रकार आहे.ही व्यक्ती आपले कौशल्य कायदेशीर किंवा बेकायदा स्वरुपाची कृत्य करण्यासाठी वापरु शकते,पण त्यातुन कोणत्याही स्वरुपाचा वैयक्तीक लाभ मिळवत नाही.ते अशी कृत्य हे सिद्ध करण्यासाठी करतात, की ते असाधारन आहेत,आणि अशी गोष्ट ते सहज करु शकतात,पण त्यातुन पैसा मिळवने हा उद्द्देश नसतो. ज्या क्षणी ते ही सीमारेषा ओलांडतात..ते ब्लॅक हॅट हॅकर बनतात.
उदाहरनार्थ : हे हॅकर जेव्हा एखाद्या सार्वजनिक संस्थेचे नेटवर्क हॅक करतात, जो एक कायदेशीर गुन्हा आहे,पकडले गेले तर शिक्षा होते,पण नेट्वर्क हॅक केल्या वर ते फक्त त्यांचा उद्देश काय होता ते सांगुन काही नुकसान न घडवता निघुन जातात , ते हॅकर या गटा मध्ये येतात.
*************************************************************************************
या विषयाची व्याप्ती खुप मोठी आहे...त्यासाठी एक पोस्ट कमी पडेल.अश्या स्वरुपाच्या हॅकिंग पासुन स्व:ताची वैयक्तीक माहिती कशी सुरक्षित ठेवावी.नेट वापरताना कोणती काळजी घ्यावी? याची उत्तरे देण्याचा प्रयत्न नक्की करीन.आज साठी इतकेच.
प्रशांत दा. रेडकर.
*************************************************************************************
एथिकल हॅकिंग (व्हाईट हॅट हॅकिंग) शिकवणार्या इन्स्टिट्यूट पुण्यात आहेत असं कळलं. मुंबईत एखादी इन्स्टिट्यूट आहे का?
ReplyDeleteया हॅंकरला पकडायचे कसे?
ReplyDeleteहॅंकर ला कसे पकडायचे?
ReplyDeleteहॅंकर ला कसे पकडायचे?
ReplyDeleteहॅंकरला पकडण्यासाठी या क्षेत्रा मधली माहिती असणे गरजेची आहे.
ReplyDeleteJaulien asange is wrl fms hckr!
ReplyDeleteNice infrmtn. Tx 4 it!
ReplyDelete