नमस्कार मंडळी,
प्रेम म्हणजे..प्रेम म्हणजे..प्रेम असत???
हा लेख मी वयाच्या १६ व्या वर्षी लिहिला होता,
आज तो या ब्लोग च्या माध्यमातून तुमच्या समोर सादर करत आहे,
बघा कसा वाटतो ते.. :)
प्रेम म्हणजे...प्रेम म्हणजे.. प्रेम असत???
©प्रशांत दा.रेडकर
प्रेम म्हणजे काय?
*******************************************************
प्रेम म्हणजे निव्वळ आंधळेपणा नव्हे.प्रेम म्हणजे निर्बुद्धपणे
एखाद्याच्या हाती सर्वस्व झोकुन देणे नव्हे.प्रेम म्हणजे शारिरीक आकर्षण तर मुळीच नव्हे.
प्रेम म्हणजे आहे ,दोन जीवांची भावनिक गुंतवणुक,दुसऱ्याला साथ देण्याची ओढ व साथ घेण्याची ओढ,परस्परांविषयी वाटणारा जिव्हाळा,आपुलकी,एकमेकांच्या दु:खाने दु:खी होणे,सुखामध्ये सहभागी होऊन सुखी होणे.
********************************************************
सध्याचे स्वरुप:
******************
सध्या प्रेम या शब्दाचा बाजार मांडलेला आपल्याला दिसतो.त्यामुळे त्याचं खर स्वरुप,पवित्र रुप आज पुर्णपणे डागाळून निघालय.नुकतीच मिसुरड फुटलेली मुलं अ अगदी आठवी,नववीतल्या मुली एकमेकांच्या प्रेमात पडतात,एकमेकांसाठी झुरतात,पत्र काय लिहितात,लाजतात काय,मुरडतात काय, त्याचा काही हिसाबच नाही.
एकमेकांच्या मित्रमंडळीनी चिडवल्यावर सुखावतात किंवा दु:खावतात.स्व:ताच्या करिअरचं वाटोळ करुन घेतात,कधी कधी आयुष्याचं देखील.
हे प्रेम नसतच मुळी.या काळात मुलामुलींच्या शरीरात नैसर्गिक बदल घडत असतात.मुलांना हा बदल अगदी नकोसा वाटतो,तर कधी कुतुहल जागवतो.कारण वागण्याबोलण्यावर मर्यादा पडतात.भिन्न लिंगीय व्यक्तीशी व्यवहार करताना संकोच वाटु लागतो.तसेच आकर्षणही वाटायला सुरुवात होते.जो तो आपल्या कल्पनेतील राजकुमार किंवा राजकुमारी शोधून मनातल्या मनात तर कधी उघडपणे त्याला साकारायला लागतात आणि इथेच नंतर पस्तावायची पाळी आणणारा काळ सुरु होतो.
पुढे पुढे जेव्हा समज येत जाते तेव्हा पश्चाताप वाटू लागतो..सर्वांच्या बाबतीत असे होते असे म्हणण्याचा भाग नाही..पण असे होते फक्त तेव्हाच,जेव्हा फक्त बाह्य आकर्षणाला भुलुन प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात.विचारपूर्वक केलेल्या गोष्टीत अशी फसगत होत नाही.
मी असे मुळीचं म्हणणार नाही की तुम्ही प्रेम करु नका.जर कराय्चे असेल तर ते डोळसपणाने करा.पण त्या आधी त्या मुलाचे किंवा मुलिचे चरित्र कसे आहे ते प्रथम विचारपूर्वक पडताळून पहा म्हणजे पस्तावावे लागणार नाही.
तो मुलगा किंवा मुलगी वागते कशी?बोलतो कसा? वागण्यात समंजसपणा आहे की नाही,त्याच किंवा तिच शिक्षण काय?दोन वेळचे पोट भरण्याची ऐपत व रहायला हक्काचे छप्पर म्हणजे ’त्याच्या आईवडीलांसहितच बर का!’ आहे की नाही ते पाहणे जरूरी!..त्याची सामाजिक स्थिती,परिसरातील वागणंबोलणं,त्याचे मित्र कसे आहेत? हे पाहणे महत्वाचं...कारण प्रेम करताना निर्णय शेवटी एकट्याला घ्यायचा असतो...अशी काळजी घेतली कि मग शेवटी निराशा येणार नाही.
एक मोलाचा सल्ला द्यावासा वाटतो तो असा की एवढा डोळसपणे निर्णय घेतल्यावर केवळ समाज आणि घरच्यांच्या भीतीने जोडीदाराचा त्याग करु नका.एखाद्याला असं उध्वस्त करण्याचा मग तुम्हाला काहीच अधिकार उरत नाही हे आधीच लक्षात घ्या.जर जोडीदार चांगला असेल तर
आईवडील तुम्हाला कधीही विरोध करणारं नाही.
©प्रशांत दा.रेडकर
*******************************************************
ता.क.:
********
लेखा मध्ये नमुद केलेली मते माझी वैयक्तिक आहेत...व्यक्ती व्यक्ती प्रमाणे मतांतर असु शकते.
*******************************************************
Apratim..!
ReplyDeleteKhup chhan salla vatla..lekh atishay awadala..
मनस्विनी..धन्यवाद
ReplyDeleteमला पहायच तुला
ReplyDeleteअलगद पापण्या मिटताना
स्वप्नांना हलकेच कुरवाळताना
स्वप्नांच्या नगरीत तु मला पाहताना
मला पाहताच तुला हरखुन जाताना
"प्रेम म्हणजे... प्रेम म्हणजे.... प्रेम असत???"
धन्यवाद :)
ReplyDeleteKhupach Channnn Mala Manapasun Aavadli.
ReplyDeleteसाधना....शुभेच्छा आणि प्रतिसादा बद्दल मनापासुन धन्यवाद
ReplyDeletemala kavita khup khup khup aavadli ani salla sudhha khup changla hota.
ReplyDeletedeepali,
ReplyDeleteधन्यवाद..तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रिया वाचल्या की अधिकाधिक लिहावेसे वाटते
:-)
Kaharach.....Khupach chhan.
ReplyDeleteधन्यवाद..तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला येणार्या नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! :-)
ReplyDelete